रविवार, २० नोव्हेंबर, २०११

जॉनी रावत घेऊन येतोय आगरी डॉन!

ठाणे/प्रतिनिधी - रविवार, १९ जून २०११
टी.व्ही.वरील स्टॅण्डअप कॉमेडी शो आणि मिमिक्री कार्यक्रमांमधून घराघरात आगरी बोलीभाषा पोहोचविणारा जॉनी रावत आता संपूर्ण आगरी भाषेतील पूर्ण लांबीचा ‘आगरी डॉन' हा चित्रपट घेऊन येतोय. नावाप्रमाणेच हा अमिताभच्या मूळ डॉनचा आगरी रीमेक आहे. आठ वर्षांपूर्वी ज़्‍ाॉनी आणि त्याचा मित्र रमेश जाधव यांनी शोले आणि डॉन हे दोन चित्रपट आगरी भाषेत रीमेक करण्याचे ठरविले होते. आधी त्यांनी ‘शोले' निर्माण केला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ते डॉन घेऊन येत आहेत.
जॉनीचा जन्म मुंबईतील कोळीवाडय़ातला. तिथेच त्याचे बालपण केले. पुढे तो डोंबिवलीत राहायला आला. इथे आगरी संस्कृतीशी त्याचा परिचय झाला. त्यामुळे ज़्‍ाॉनी उत्तम आगरी बोलतो. ऑडिओ कॅसेटयुगात त्याची मिमिक्री तुफान गाजली. विविध वाद्यवृंदांमधून जॉनी नियमितपणे मिमिक्री करतो. पुढे झी मराठी वाहिनीवरील हास्यसम्राट मालिकेने जॉनीला चांगलीच लोकप्रियता मिळवून दिली. ‘गाढवाला लग्नाची घाय', ‘बाला झायलाय करोडपती' ही व्यावसायिक नाटकेही त्यांनी केली.
आगरी डॉनमध्ये शीर्षक भूमिका अर्थातच जॉनी रावत यांनी साकारली आहे. निळजे रेल्वे ट्रॅक, तुर्भे मासळीबाजार, महापे, जेटीबंदर, घणसोली आदी परिसरात या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटात तीन गाणीही आहेत. येत्या गणेशोत्सवात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा