सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

राणी लक्ष्मीबाईंची आरती



राणी लक्ष्मीबाईंची आरती
जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
तांब्यांच्या घराण्यातील तू शूर मनु देवी .
नानासाहेब,तात्या टोपे हे तुझे सोबती  देवी
ह्या स्वातंत्र समरी .................



जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
" झाशी " हे राज्य आहे तुझे देवी
मराठ्यांच्या कुळात तू वाढलीस देवी
संस्कार युद्धाचे दिधले तुला पेशव्यांनी
छत्रपतींचे बळ अंगी आहे तुझ्या देवी


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
 शौर्याचे वरदान ,स्वातंत्र्याचे प्रेम दिधले तू देवी
यवन नाशिनी स्वातंत्र्यदेवता तू देवी
मर्दानी राणी ,अग्निज्वाला दघ्द करशी यवननराधमा
मातले पांढरे त्यांना तू मारिले !


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
 रणशिंग फुंकले १८५७ ला देवी तुझ्या सोबत्यांनी
मी माझी झाशी देणार नाही असे ठणकाउन सांगितले
तू देवी त्या श्वेतम्लेछान्सी
पुत्राला बंधूनी पाठीशी लढलीस तू देवी
अमर होऊनी आमच्या मनात राहिलीस देवी


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी

तुला लक्ष्य प्रणाम देवी !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा