संघ आणि हिंदु समाज वेगळा नाही.
संघस्थापने नंतर जेव्हा पहिल्यांदा हिंदु मुसलमान दंगलीत हिंदुनी मुसलमानांना चोप दिला तेव्हा त्यानंतर संघाचे हिंदु समाजाकडुन उत्स्फुर्त स्वागत झाले. त्यानंतर नागपुरच्या जवळच्याच विभागात मुसलमानांची दंडेली वाढु लागली त्यावेळी तिथल्याच एका परीचीताने प. पु. डॉक्टरजींना त्या मुसलमानांचा बंदोबस्त करण्यासाठी तुमचे स्वयंसेवक पाठवुन द्या असे सांगीतले. त्यावेळी डॉक्टरजींनी सांगीतले की, “ संघ म्हणजे संघटीत गुंडांची टोळी नव्हे. जी प्रत्येक ठिकाणी हिंदु विरोधकांचा बंदोबस्त करेल. तुम्ही स्थानिक हिंदुना संघटीत करा. त्यांना आत्मरक्षणाचे शिक्षण स्वयंसेवक देतील. त्यांनी स्वतःचे रक्षण स्वतः करायला हवे.”
खरं तर संघाच्या या आद्य सरसंघचालकांनी संघाचे ध्येयच या घटनेतुन सांगीतले आहे. संघ ही हिंदुंचीच परंतु हिंदुंपासुन वेगळी अशी संघटना नाही. तर संघ या समाजाचाच भाग आहे. आणि हा समाज या संघाचा भाग आहे. “ज्यावेळी समस्त हिंदु समाज संघाच्या एक राष्ट्रीय भावनेने भारला जाईल, आपापसातील समस्त भेद विसरुन हिंदु समाज एक होईल त्यावेळी संघाचे वेगळे अस्तित्व उरणार नाही आणि त्याची गरज देखील असणार नाही.” असे एकदा आदरनीय गोळवलकर गुरुजी बोलले होते. संघाचे ध्येय, संघविचार आज स्वयंसेवकांच्या मनात घर करुन बसले आहेत, पन दुर्दैवाने स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी म्हणवनारे मात्र संघाचे हे ध्येय समजुन न घेता संघावरच टिका करत आहेत. त्यात “त्यांचा काय स्वार्थ आहे?” ते श्रीकृष्ण जाणो.
काल एक जण विचारत होता की, माजी सरसंघचालक सुदर्शनजी यांच्यावर बिग्रेड्च्या काही कार्यकर्त्यानी चप्पल भिरकावली, त्याचा सुड संघ का घेत नाही?
मला एक कळत नाही, हे बिग्रेडी म्हणजे कोण हो? आमचेच वाट चुकलेले भाऊ ना? की ते आकाशातुन कोसळलेत? मान्य आहे की, आज ते काही स्वार्थी लोकांच्या नादी लागुन स्वधर्म, स्वसमाज या विरोधात बोलत आहेत. पण ते जे बोलत आहेत ते १००% चुकीचे आहे का? आमच्या समाजात आज भेदाभेद नाही आहेत का? आमच्या समाजात आजही आडनावावरुन माणसाची जागा ठरवली जात नाही का? आज आमच्या धर्मात चुकीच्या प्रथा अस्तित्वातच नाहीत का? धर्माच्या नावाखाली स्त्रियांचे शोषण आज आमच्या समाजात होतच नाही का?
मग अशावेळी एखाद्या संघट्नेने स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी शोषणमुक्त, भेदभावमुक्त समाजाचे स्वप्न या तरुण हिंदु मनाला दाखवल्यामुळे ते जर अशा लोकांच्या नादी लागले तर त्यात चुक फक्त त्यांचीच आहे का? भले संभाजी बिग्रेड, बामसेफ या तरुण मुलांना फसवत असतील पण ज्या कारणामुळे ही मुले या संघट्नांच्या नादी लागलीत ते कारण चुकीचे आहे का? त्या मुलांचे शोषणमुक्त, भेदभावमुक्त समाजाचे स्वप्न चुकीचे आहे का?
अशावेळी जीथे आपलेच दात आणि आपलेच ओठ अशी परिस्थीती आहे तिथे संघाने या मुलांवर सुड घ्यायचा का? का? तर त्यांचे विचार वेगळे आहेत म्हणुन? की ते आपले कार्यकर्ते नाहीत म्हणुन? मला वाटतं इथे ते आमचे कार्यकर्ते आहेत किंवा नाहीत यापेक्षा ते तरुण वाट चुकलेले आमचेच हिंदु बांधव आहेत हे जास्त महत्वाचे आहे. त्यांच्यावर सुड उगवण्यापेक्षा परत त्यांना आपल्या विचारधारेत कसे आणता येईल? याचा विचार व्हायला हवा. आणि असे न करता त्यांच्यावर सुड उगवायल गेलो तर आणखी एक शत्रु आपण आपल्या घरात निर्माण करु.
राहीला प्रश्न तर आपल्या या हिंदु भावंडांची माथी भडकवनारे खेडेकर, कोकाटे, गायकवाड यांच्यासारख्या लोकांचा बंदोबस्त करण्याचा………….. तर आपण यांना फटके दिले तरी यांचा लगेच महात्मा केला जाईल. चौकाचौकात या विकाऊ माणसांचे पुतळे उभे केले जातील. त्यांनी स्वार्थापोटी समाजात जी विषपेरणी केली आहे त्याला तरारुन कोंब फुटतील. समाज-मन दुभंगलेले राहील. याला उत्तर म्हणुन या लोकांचा खोटारडेपणा, पैश्यासाठी आत्मा विकणारी यांची स्वार्थी वृत्ती फसलेल्या हिंदु तरुणांसमोर आणायला हवी. एकदा का आपली फसवणुक झाली आहे हे या भाबड्या तरुणांना कळले की या लोकांचा बंदोबस्त ते स्वतः करतील. अर्थात ह्याला किती वेळ जाईल हे माहीत नाही. पण आपल्या घराचेच दोन भाग करण्यापेक्षा थोडी वाट बघितलेली नक्किच चांगली.
राहीला प्रश्न – संघ आज ७५ वर्षांपेक्षा जास्त वेळ कार्यरत असुन संघाला हिंदुराष्ट्र का निर्माण करता आले नाही? तर सरळ साधे उत्तर आहे कि आज या देशात केवळ हिंदु आणि मुस्लिम हे दोनच समाज आहेत का? आमच्या पुर्वजांनी धर्माच्या नावावर ज्यांच्यावर अत्याचार केले आणि त्या अत्याचाराला कंटाळुन ज्यांनी धर्मांतरण केले तो बौद्ध समाज आमच्या देशात नाही का? उद्या जर संघाने भारताला हिंदु राष्ट्र बनवण्याचा प्रयत्न केला तर हा समाज शांत बसणार आहे का? तो बंड करुन उठणार नाही का? मुस्लिम आणि ख्रिश्चन समाज काय करेल हे वेगळे सांगायला नकोच. पण जो बौद्ध समाज भारताला आपली मातृभुमी मानतो त्या समाजाशीच आपण युउद्ध करायचे? म्हणजे घराचा ताबा मिळावा म्हणुन एका भावाने दुसर्या भावाचा गळा दाबायचा? कशासाठी? आपल्या पुर्वजांनी केलेल्या चुका विसरुन त्या समाजाला आपण आपलेसे नाही करु शकत का?
अशावेळी देशांतर्गत जी यादवी निर्माण होईल, अर्थव्यवस्था मोडकळीस येईल त्याचा कोणी विचार केला आहे का? इथे साला लोकांना स्वतःचे पोट भरताना स्वतःचा शेजारी जिवंत आहे कि नाही हे बघायला वेळ नाही तो हिंदु समाज अशावेळी कसा वागेल? त्या परीस्थीतीला तोंड देण्यास या संघावर टीका करणार्या स्वयंघोशीत हिंदु संघटना सक्षम आहेत का? बाबरी आंदोलनाच्या वेळी हिदु वोट बॅंक कॅश करायला आणि बाबरीचे श्रेय घ्यायला भाजप बाबरी आंदोलनात उतरला. त्यामुळे स्वदेशी जागरण मंच एकटा पडला. परिणामस्वरुप बहुसंख्य ग्रामीण भागात राहणारा हिंदु समाज २० वर्षे मागे गेला. ते चट्के आजही तो हिंदु समाज विसरला नाहीये.
राष्ट्रनिर्मिती म्हणजे बाहुल्यांचे लग्न नव्हे. पिढ्या न पिढ्या जेव्हा राष्ट्रनिर्मीतीच्य एकाच ध्येयाने एकत्र येऊन संघर्ष करतात तेव्हा कुठे राष्ट्राचा पाया उभारला जातो. आज स्वातंत्र्य मिळुन ६० पेक्षा जास्त वर्षे होऊन देखील आमच्या देशाची समाधानकारक प्रगती साधता आली नाही कारण तत्कालीन आमच्या नेत्यांपुढे फक्त स्वातंत्र्य मिळवणे एवढाच हेतु होता. त्यानंतर नवोदीत राष्ट्राच्या उन्नतीसाठी काय केले पाहीजे याचा विचार कोणत्याही राजकिय नेत्याने केला नव्हता. त्यामुळेच आमचा देश भ्रष्ट आणि लाचखोर लोकांचा देश बनला आहे. आम्हाला जे हिंदुराष्ट्र बनवायचे आहे ते असेच भ्रष्ट, लाचखोर, स्वार्थी लोकांचे राष्ट्र बनवायचे आहे का? आम्हाला मुसलमानांसारखे आमचा देव महत्वाचा, राष्ट्र जगले काय किंवा मेले काय? अशा विचारांच्या लोकांचे राष्ट्र बनवायचे आहे का?
सरसंघचालक म्हणाले की, “देवी देवता गुंडाळुन ठेवा.” लगेच स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणा-या संघट्नांच्या पोटात गोळा उठला. काय चुकीचे बोलले? आज आमचा देश चारी बाजुंनी शत्रुंनी वेढला जातोय, चिनचे सैन्य पाकिस्तान – भारत सिमेवर बंकर्स खोदत आहे, श्रीलंकेने त्यांचे हवाई तळ भारताविरुद्ध कारवाई करण्यास सोपे जावे म्हणुन चिनला वापरायला दिले आहेत. नेपाळ माओवाद्यांच्या ताब्यात गेलाय. ब्रम्हदेशाशी आमचे चांगले संबंध राहीले नाहीत. पाकिस्तान, बांग्लादेश यांचा तर विचारच सोडुन द्या. अशा तर्हेने आपला देश चारी बाजुनी वेढला गेला असताना आम्ही देवदेवतांचे पुजन करायला हवे कि शस्त्रांचे पुजन करायला हवे? जर हा देशच आपला राहीला नाही तर आपल्या देवी देवतांना कोण विचारणार? पुजा अर्चा करण्यासाठी देवळे तरी जागेवर राहतील का?
संघावर टीका करण्यापेक्षा जरा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा. संघ म्हणजे हिंदु समाजापासुन वेगळी अशी हिंदुंची संघटना नव्हे. संघ हा या समाजाचाच भाग आहे. हिंदु धर्माने जगाला जी सुंदर आणि शाश्वत जिवनमुल्ये दिली आहेत तीच मुल्ये संघ जपतोय आणि समाजात त्यांचे प्रसारण करत आहे. संघ आणि हिंदु समाज हे वेगवेगळे नसुन या एकाच नाण्याच्या दोन बाजु आहेत. ज्या दिवशी या दोन बाजु परस्परांत एकरुप होतील त्यादिवशी संघाचे अस्तित्व संपलेले असेल. आणि तुमच्या आमच्या स्वप्नातले हिंदुराष्ट्र जन्माला असेल.
टिप – देव, देश, धर्मासाठी संपुर्ण आयुष्याचा होम करणार्या अनेक पिढ्या ज्या संघाने हिंदु समाजाला दिल्या त्या संघाला रिटायरमेंटनंतर फावला वेळ घालवण्यासाठी हिंदुत्वाच्या कार्यात आलेल्या व्यक्तीने सल्ले द्यायला सुरुवात केल्यामुळे हा लेखनप्रपंच मांडावा लागला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा