रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

क्षत्रियत्व रक्तातच असत !

शुध्द आगर्यांचे शुद्ध रक्त ……योद्ध्ये शेती मीठ पिकवू, लागले ,म्हणून काय ते शुद्र बनत नाही क्षत्रियत्व रक्तातच असत !

December 18, 2013 at 9:20pm
सैनिकांचे शेतकरी,आगरकरि  झाले परुंतु रक्त तेच आहे ना
उसळणारच !

आगरी
 – यांस आगळे कुणबी असेंहि म्हणतात. हे अजून मराठ्यांत मिसळले नाहींत. राजा बिंब यानें ती सरकारची विनंति मान्य करून आपलें सर्व सैन्य घेऊन ठरल्याप्रमाणें दिल्लीहून येणाऱ्या मुसुलमान सरदारास ठाण्याजवळ येऊन मिळाला. मुसुलमान सरदरानें पश्चिमेच्या बाजूनें जाऊन गडावर स्वारी करावी, व लढाईस सुरवात झाली म्हणजे राजानें आपले लोक घेऊन पूर्वेकडील बाजूनें गड चढून हल्ला करावा असें ठरलें होतें. त्याप्रमाणें दोघेहि चाल करून गेले. पश्चिमेच्या बाजूस लढाईस सुरवात झाल्याबरोबर राजा बिंबानं आपल्या सर्व लोकांसह गड चढून छापा घातला; व गडावरील सरदारांचा मोड करून त्यास पकडून दिल्लीहून आलेल्या सरदाराबरोबर त्यास दिल्लीस पाठवून दिलें व आपण गडावर राहून राज्यकारभार पाहू्ं लागला. कांहीं दिवसांनीं त्यानें चौल व आबास सासवणें येथील राज्यें जिंकलीं. आसपास कोणी शत्रू नसल्यामुळें राजानें परत जाण्याचा बेत रहित करून तेथेंच कायमचें राज्य स्थापण्याचें ठरविलें. त्यच्या सैन्यासहि हा बेत पसंत पडून तें तेथेंच राहिलें. शांततेच्या वेळीं इतक्या मोठ्या सैन्याची जरूर नसल्यामुळें राजानें पुरेसे लोक पदरीं ठेवून बाकींच्यांनां मिठागरें बांधून दिलीं व जरूर त्या ठिकाणीं गांवठाणें बसवून तेथें वसाहत करण्यास सांगितलें. मिठागराचे उत्पन्न चांगलें व किफायतशीर असल्यामुळें मुंगीपैठणास जाण्यापेक्षा येथेंच राहणें या लोकांस अधिक आवडलें. राजा बिंबानंतरहि त्यचे वंशज हें राज्य पुष्कळ वर्षे सुरळीतपणें चालवीत होते
पुढें हळूहळू मिठागरें व वसाहती वाढत जाऊन आगरी लोकांची वसति कुलाबा जिल्ह्यांतील अलीबाग, पेण, पनवेल, कर्जत, रोहों व माणगांव तालुक्याचा थोडा भाग येथे व जंजिरा व ठाणें जिल्ह्याचा बराच भाग या ठिकाणीं पसरत गेली. जेथें खारटपणाचा भाग आहे तेथें व त्याच्य लगतच्या प्रदेशांतच फक्त आगरी लोकांची वसति पसरलेली आहे, याचें कारण असें दिसतें कीं मिठागराचा धंदा चागंला व किफायतशीर वाटल्यामुळें राजाबिंबोंन मिठागरें बांधून दिलीं तीं त्याच्या बरोबर असलेल्या लोकांसच पिकविण्याचा हक्क दिला असावा व त्यामुळें दुसऱ्या लोकांचा या धंद्यांत शिरकाव झाला नसावा असें दिसतें. याप्रमाणें हा धंदा आगरी जातींत पिढयानुपिढया चालत आलेला आहे असें हल्लीच्या स्थितीवरूनहि स्पष्ट दिसत आहे. नवीन आलेल्या लोकांचा मुख्य धंदा आगराचा होऊन राहिल्यामुळें व अपरिचितपणामुळें त्यांच्या जातींचें नांव मूळच्या लोकांस माहीत नसल्यामुळें मूळचे लोक ह्या नवीन लोकांस आगरी, या नांवानें संबोधूं लागले
व पुढें हेंच नांव त्या विशिष्ट लोकांच्य जातीचें नांवें धंद्यांवरून पडेलेली आहेत या तत्वास धरूनच या जातीचा आगर पिकविण्याचा मुख्य धंदा झाल्यामुळें या जातीस आगरी हें नांव पडलें

शुध्द आगर्यांचे शुद्ध रक्त ……योद्ध्ये शेती मीठ  पिकवू, लागले ,म्हणून काय ते शुद्र बनत नाही क्षत्रियत्व रक्तातच असत !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा