नथूराम वि. गोडसे मृत्युपत्र .....
मृत्युपत्र
प्रिय बंधो दत्तात्रय वि. गोडसे
माझ्या विम्याचे पैसे आले तर त्याचा विनियोग घरच्या कामी करणे. रु.२०००
आपल्या पत्नीला, रु. ३००० गोपाळच्या पत्नीला आणि रु. २००० आपल्याला माझ्या
मृत्यूनंतर मिळावेत, असा मी विम्याच्या कागदपत्रांवर लेख केला आहे.
माझी उत्तरक्रिया करण्याच्या अधिकार आपणास मिळाल्यास कोणत्याही प्रकारे ते
काम करावे, परंतु माझी एकच विशेष इच्छा इथे लिहीत आहे.
जिच्या तीरावर प्राचीन द्रष्ट्यांनी वेदरचना केली ती सिंधू नदी आपल्या भारतवर्षाची
सीमारेषा आहे.
ती सिंधू नदी ज्या शुभ दिवशी पुन्हा भारातवर्षाच्या ध्वजाच्या छायेत स्वच्छंदतेने
वाहत राहील त्या दिवसात माझ्या अस्थींच्या रक्षेचा काही अंश त्या सिंधू नदीत प्रवाहित
केला जावा,
ही माझी इच्छा सत्यसृष्टीत येण्यासाठी आणखी एक-दोन पिढ्यांचा कालावधी
लागला तरी चिंता नाही.त्या दिवसापर्यंत तो अस्थींचा अवशेष तसाच ठेवा आणि आपल्या
आयुष्यात तो शुभदिवस आला नाही तर आपल्या वारसांना माझी इच्छा सांगत राहा.
माझे न्यायालयातील वक्तव्य शासनाने कधी बंधमुक्त केले तर त्याच्या प्रकाशनाचा
अधिकार मी आपल्याला देत आहे.
न्यायालयाची मुद्रा
नथूराम वि. गोडसे
१४-११-४९
अभिप्रमाणित (attested)
दंडाधिकारी , प्रथम वर्ग (स्वाक्षरी)
मी आज १०१ रुपये आपणास दिले आहेत ते आपण सौराष्ट्र सोमनाथ पुनरुद्धार
होत आहे, त्याच्या कळसाच्या कार्यासाठी धाडून द्यावेत.
नथुराम वि. गोडसे
१५-११-४९ : सुप्रभात ७l वाजता

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा