आगरी भाषेतील
विद्रोह कविता
आज आयलाय पाऊस माजे दारान जसा मोराचा नाच , तान्हे बाला चा हसना
आथा बरसतंय आइसा जैसा सोसाट्याचा वारा
एन. एम. टी. बस भिजलीय आथा सगळ्या लोखांना चाहूल
लागली घरची गावांची
जुना गाव कसला व्हता सोन्या सारखा गरीबांचा घर ,बैलगारी सरकव
चालाच्या
अविकसित होतु
पुन गाई म्हशी दुध दुभात्यान भरलेला गाव व्हता शेणानी सारवलेला आमचा घर
व्हता
आथा शेर झायालय इथ आमचे गावाचा गावठाण झाला
नाय रायालीय जुन्यांची मजा
सिरको
तोराला बसलीय आमचेच जमिनीन वारावलेली घरा
आमचा जुना गाव बारा होता माणुसकी होती
सगल्यांना आथा नुसताच झगर होतान
उम्बय जेली थाना जेला आथा नवी उम्बाय पुन जाईल
हातांशी
परक भय्ये येवून बसलं आमचे छाताराव
इखन्चा आमदार
आगरी-कोली खासदार
आगरी-कोली पुन
आथा आगरी कोलीच परक्यांचे गर्दीन दिसानसा झाला
आगरी कोल्यांचा समिंदर सुद्धा हातांशी जेला
कसा घरावावा भविष्य पोराबालांचा
आमीच इथले भूमिपुत्र पाहिलं तरी आमचा वाटोळा
झाला
बाहेरचे भय्यांनी घेतला आमचा मच्छीचा धंदा
सरकारांनी आमची जमीन कमी भावान जबरदस्तीन हिसकावून घेतली
आथा आमालाच येरण कारथान बायेराची माणसा
आमचे भाषेला हसतान , आमचे संस्कृतीला हसतान
आथा बस झाला सारा आथा वेल आली
संघटीत
रावून विद्रोह कराची आमाला हसाल
येरन कराल तर खबरदार!
इथुनशि बायेर
सोरणार नाय अन्याव केलाव तर जीत सोरणार
नाय !
काह्यान गेल माझ आगरी कोली भूमी पुत्र ?
कला भांडता व आपसान याचंच त फायदा घेतान
राजकारणी लोख
बायेर च न सरकार
एकीच बल जाम भारी दादुस 'एक रायालू तर कनचे शाहनचि आपले
वाटला जावाची हिम्मत
नाय !