शनिवार, २४ डिसेंबर, २०११

प्रीतिचा गारवा



प्रीतिचा गारवा


चेहरा तुझा मनोमनी आठवला जातोय
मैत्री सारख  हे नात नसेलच दुसर
गुणांतिल  गुण स्वभावाचे स्मित

चक्षु तुझे किती मादक
अगदी शुद्ध मधाची साठवण
बालसूर्य किरणे घेउन आला
नव्या प्रभातेची ...विहंग उडू लागले नित्य
मन आता तुला स्मरू लागले

तारुण्याचे वेध मनाला अगदी उमगू लागले
शुक्रासारखे सोंदर्य  रसिकांना वदवू लागलय
स्तुतीची कवन गायली जात आहेत ...
त्या दोघांचेही मन आता समरूप होत आहे .

पहाटेचा गारवा आता कमी होत आहे .
सूर्यदेव आता पश्चिमेला कलतो आहे
की नित्य माझ मन तुला स्मरत आहे .
ओढ़ लागली तुझी ...........
सांग प्रिये  कधी तू होशील  का माझी ?

तुझ्या विवन्चनेची प्रासंगिकता कधी कळली  नाही माला
, अश्रुंच्या ओहोळत  ति जाणवली आज .......
माफ़ कर जर काही घडले मजकडून  आक्षेपार्ह ,
तुझ्या प्रीतिचा गारवा अजुनही जाणवतोय
का कुणास ठाउक तुलाही असच वाटते..........
जीवनात माझ्या आलीस तू .....एक परी बनून ...

शेवट करेन मी तुझे स्मरण करुनी ....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा