रविवार, ११ डिसेंबर, २०११

ब्रम्ह कमळ

ब्रम्ह कमळ : एक सुखद अनुभव ...पावसाळ्याच्या दिवसांत अंधाऱ्या रात्री उगवलेल सुंदर फुल .
सारडे ,उरण ,रायगड मध्ये राहणारे श्री महेंद्र म्हात्रे यांच्या बागेत ही सुंदर फुले उगवली ..विशेषत: त्यांना  फुल आणि फळ झाडांची प्रचंड आवड आहे .आणि त्यांची हीच आवड ह्या सुंदर फुलाशी माझी ओळख झाली ....फारच अभावाने ब्रम्हकमळ हे आढळते .....विशेष म्हणजे त्यांचे आभार मानले पाहिजेत .....
खाली काही क्षणचित्रे प्रदर्शित केली आहेत तुम्हाला ती नक्कीच आवडतील .....खाली काही क्षणचित्रे प्रदर्शित केली आहेत तुम्हाला ती नक्कीच आवडतील .....











माझ मी पण .

माझ मी पण .....स्पष्ट सांगायच झाल तर कुणी हि मला माझ्या पासून हिरावून घेऊ शकत नाही !
माझ हसन हे नेहमी माझ्याच साठी असत ..यात कोणतीही संकुचित कृती मला वाटत नाही जे मला वाटत ते मी करतो .मी नेहमी काहीतरी वेगळेपण शोधात असतो ..जेंव्हा ते मला मिळत तेंव्हा माझा आनंद द्विगुणीत होत  असतो ....



रडन विसरून गेलो......

रडन विसरून गेलोय हसने नाही .....माला रडवनारी या जगताच आता नसेलच ! कारन ती या मुम्बई मधल्या गर्दित हरवलीय! का कुणास ठाउक ती आज देखिल माझी वाटत पाहत आहे अस वाटतय............):...
 माझ तैल चित्र .......

रविवार, ४ डिसेंबर, २०११

होय प्रेम महान आहे !

होय प्रेम महान आहे !
ह्रुदयताल्या भावना तुझ्याचसाठी व्याकुळ व्हाव्यात
तुझ रागावन फक्त माझ्यासाठी असाव
तुझ्या प्रत्येक नजरेत एक सौदर्याभास आहे
बुद्धि म्हणते ती तुला मुर्ख बनवते
ह्रदय म्हणत या मुर्खपनालाच प्रेम म्हणतात
जरी तुझ लग्न इतर कुणाशी झाल तरी
आत्मा मात्र माझ्याजवळ असावा .
वासनेच्या कसोटीत अड़कनारे हे पापी मन
तुझ्या फ़क्त नजर स्पर्शाने पवित्र होते
कुण्या मंदिरात राधा कृष्ण एकमेकांसोबत आहेत
तर कुठे राम सीता , पण हे नात अजाण आहे.
मनामधिल पवित्रता तुझ्या फ़क्त नावानेच निर्माण होते
.या प्रेमाला वासनेची कसोटी नाहि
हे गंगे इतके पवित्र आहे तरी ही याच अस्तित्व का शून्य आहे . का खरच
इतके सर्व होऊं देखिल माझ तुझ्यावर प्रेम आहे
त्या मंदिरामधिल सत्संगात गढून गेलेले तुझे मन फ़क्त एका नजरेने आठवले जाणारे भास होते की सत्य , देवाशिवाय या प्रेमाला वाली कोण ?
कुठे तरी ऐकले होत लग्नाच्या गाठी स्वर्गत जोडल्या जातात , तर त्याच हे फल होत की माझ्या मागच्या जन्मातिल भोग
खरच तू सात जन्म तुझ्या पति बरोबर रहिलिस की आठवा जन्म माझ्यासाठी घे .यात खरच निरपेक्षता आहे .
तू माझ्यासाठी नाहि आणि मी तुझ्या साथी नाहि
आपन आहोत एकमेकांसाठी
तर मग आठव्या जन्मात   भेटू मी वाट पहिन                    ........................


मंगळवार, २९ नोव्हेंबर, २०११

अपयश

अपयश
यश अगदीच हुरळविते मनास त्याच्या
चव न चाखली त्याने कधी अपयशाची  त्यापूर्वी
अंधाराच्या खाईतले अपूर्व हे प्रकाशित हीरे .
सुर्याची किरणे न पोहचली तेथे

अपयशाची महती न कळली त्यास .
ग्रहण लागले त्या सूर्यास रहने गीळले
त्याच्या यशास नकार ऐकुनी मन हैरान झाले
या अपयशाने लाविला त्याच्या मनास काळीमा
शिव्या देत तो भाग्याला म्हणाला हे अपयश म्हणजे केवल
शत्रुचेच शाप

खरया सोन्यापेक्षा  शुद्ध बनाविते हे
परीक्षा ही कर्माची जसे भट्टी मध्ये उष्ण केलेले सोने
सर्व अहंकार नष्ट करुनी आयुष्याचे मार्ग दाखवीते
राजाला रंक आणि रंकाला रजा बनविते हे भाग्य
अपयश म्हणजे आहे यशाची पहिली पायरी
मर्कट हे लहान चढ़ती झाडावरती अनेकदा ते पड़ती
अखेरीस ते झाडावर चढ़ते अपयशाने खिजुन न जाता करावे कर्म .
यश ज्याला मिलते ज्याला अपयशाची किम्मत कळते 

स्पर्श

  • स्पर्श
    हर्ष एकला थेम्बासारखा ओंजलित माझ्या तो न सामावला
    भूमीला तो हलकेच भिडला
    स्पर्श त्याचा तिला आवडला ती देखिल झाली ओलिचिम्ब ...
    प्रत्येक स्पर्शाच स्वरुप होत भिजलेल्या देहासारख....
    प्रीत दोघांची होती क्षणासाठी
    तरीही ती वाटे सात जन्माची .....
    निसर्गाच्या बाहुपाशात सात स्वर्ग आज अनुभवले ...
    धुतल गेल मन त्या अनोख्या सहवासात ....