शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

RedDodo.com








पर्वताघर

मैत्रीण

मनी माझ्या नव्हता कोणताही ध्यास ..
आयुष्याच्या प्रवासाला नुकतेच झाली होती सुरवात
कुणीही नव्हता आपल म्हणणारा माणूस ..........
एकटेपणाची हि होती पहिलीच चाहूल

अश्रूंच्या ओघात दिपले होते नेत्र माझे
प्रेमासाठी आसुसले होते हृदय
अनोख्या वेळेत कुणीतरी आपुलकीने केली चौकशी
नीटनेटका वेळ जात होता प्रेम ....म्हणजे काय असत ते माहित नव्हत
तूच जाणीव करून दिलीस ....
हरवलेल्या संध्याकाळ हरवलेल्या रात्री
तुझ्या प्रेमातच मोहरून गेलो

फाजील आत्मविश्वास नडला मला
तुझ्या प्रेमातच पडलो.....
चल जे झाल गेल विसरून जा फक्त आता
मित्र म्हणून प्रवास करूया नको प्रेम नको अफैर
जिथे जा सुखी राहा ......

माझ आता लग्न झालाय
कृपया माझ्या नादी नको लागुस
मित्र बनू खुश राहू
माझ्या बायकोला  धोका देन कधी जमणार नाही मला
प्रभू रामाचा आदर्श ठेवलाय आता ....
पुढील आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा

सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

राणी लक्ष्मीबाईंची आरती



राणी लक्ष्मीबाईंची आरती
जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
तांब्यांच्या घराण्यातील तू शूर मनु देवी .
नानासाहेब,तात्या टोपे हे तुझे सोबती  देवी
ह्या स्वातंत्र समरी .................



जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
" झाशी " हे राज्य आहे तुझे देवी
मराठ्यांच्या कुळात तू वाढलीस देवी
संस्कार युद्धाचे दिधले तुला पेशव्यांनी
छत्रपतींचे बळ अंगी आहे तुझ्या देवी


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
 शौर्याचे वरदान ,स्वातंत्र्याचे प्रेम दिधले तू देवी
यवन नाशिनी स्वातंत्र्यदेवता तू देवी
मर्दानी राणी ,अग्निज्वाला दघ्द करशी यवननराधमा
मातले पांढरे त्यांना तू मारिले !


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
 रणशिंग फुंकले १८५७ ला देवी तुझ्या सोबत्यांनी
मी माझी झाशी देणार नाही असे ठणकाउन सांगितले
तू देवी त्या श्वेतम्लेछान्सी
पुत्राला बंधूनी पाठीशी लढलीस तू देवी
अमर होऊनी आमच्या मनात राहिलीस देवी


जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी

तुला लक्ष्य प्रणाम देवी !


रविवार, २० नोव्हेंबर, २०११

काही ठराविक छायाचित्र



खुद्द पोर्तुगीजानीही म्हंटलेल होत कि या काळात संभाजी राजानंइतके शक्तिशाली कुणीच नाही !
थोर ते धर्मवीर राजे संभाजी 
थोर तो त्यांचा पराक्रम .........

जय भवनी
जय शिवाजी
जय शंभूराजे


ससा ससा दिसतो कसा कापूस पिंजून ठेवलाय जसा !

लाल लाल डोळे छान असे बालपणी आपण सर्वजण गुण गुणात असे
ससा हा पापभिरू प्राणी आहे तो गोंडस आहे अगदी लहान बाळासारखा वाटतो ....हा पाळीव प्राणी  खूप जणांना प्रिय आहे अगदी मला सुद्धा प्रिय आहे त्याची हि काही क्षणचित्रे

 आवडले कि नाही !