शुक्रवार, १८ मे, २०१२

कुंकू,


भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे.........

पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त
स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध
लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया पिंजर
लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात
वापरली जायची. पूर्वीच्या काळी स्त्रिया चंद्रकोर लावायच्या.

हिंदू धर्मात स्त्रीचं सौभाग्य कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे समजतं. कोणत्याही
लग्न झालेल्या स्त्रीने कपाळावर कुंकू लावावं, असा अलिखित नियम आहे. हिंदू
धर्मात कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र
हे तीन सौभाग्यालंकार मानतात.

हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि सिरियल्सचा खूपच प्रभाव होत
चाललेला दिसतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? म्हणूनच आज
असंख्य प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या
लावण्याचा स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये ओघ दिसून येतो.

अलीकडच्या फॅशनच्या युगात कपड्यांच्या लेटेस्ट स्टाइलमुळे नवीन लग्न
झालेल्या मुली टिकली लावत नाहीत. जीन्स, टी-शर्ट घातल्यावर टिकली
सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर लग्न समारंभात
साडीवर, शरारा अशा कपड्यांवर टिकलीशिवाय कोणत्याही
स्त्रीच्या सौंदर्याला उठाव येत नाही.

हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशनचा
शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या
नावाखाली अनेक नवीन-नवीन
वस्तू बाजारात येत आहेत.
अशाच या फॅशनच्या युगात
ड्रेसवर किंवा साडीवर
लावण्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारच्या, आकाराच्या
आणि रंगाच्या अनेक टिकल्याही
बाजारात आल्या आहेत. काही
स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात,
काही कपाळभर मोठ्ठ कुंकू लावतात
तर काही जणी पूर्ण मळवट भरतात
अगदी ह्या काळातदेखील.

टिकली किंवा बिंदी
हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या
सौंदर्यात नक्कीच भर पडते.
— with Milind Vaidya.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा