रविवार, १६ फेब्रुवारी, २०१४

the great veer savarkar ....

the great veer savarkar ....

July 9, 2011 at 10:17pm
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा, प्राण तळमळला
भूमातेच्या चरणतला तुज धूता
मी नित्य पाहिला होता
मज वदलासी अन्य देशि चल जाऊ
सृष्टिची विविधता पाहू
त‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झाले
परि तुवां वचन तिज दिधले
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीन
त्वरित या परत आणीन
विश्वसलो या तव वचनी मी
जगद्‌नुभवयोगे बनुनी मी
तव अधिक शक्ती उद्धरणी मी
येईन त्वरे, कथुनि सोडिले तिजला
सागरा, प्राण तळमळला
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशी
ही फसगत झाली तैशी
भूविरह कसा सतत साहु या पुढती
दशदिशा तमोमय होती
गुणसुमने मी वेचियली या भावे
की तिने सुगंधा घ्यावे
जरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचा
हा व्यर्थ भार विद्येचा
ती आम्रवृक्षवत्सलता, रे
नवकुसुमयुता त्या सुलता, रे
तो बाल गुलाबहि आता, रे
फुलबाग मला, हाय, पारखा झाला
सागरा, प्राण तळमळला
नभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारा
मज भरतभूमिचा तारा
प्रासाद इथे भव्य, परी मज भारी
आईची झोपडी प्यारी
तिजवीण नको राज्य, मज प्रिया साचा
वनवास तिच्या जरि वनिचा
भुलविणे व्यर्थ हे आता, रे
बहु जिवलग गमते चित्ता, रे
तुज सरित्पते जी सरिता, रे
त्वद्‌विरहाची शपथ घालितो तुजला
सागरा, प्राण तळमळला
या फेनमिषें हससि निर्दया कैसा
का वचन भंगिसी ऐसा ?
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते
भिउनि का आंग्लभूमीते
मन्मातेला अबला म्हणुनि फसवीसी
मज विवासनाते देशी
तरि आंग्लभूमी भयभीता, रे
अबला न माझि ही माता, रे
कथिल हे अगस्तिस आता, रे
जो आचमनी एक क्षणी तुज प्याला
सागरा, प्राण तळमळला

राणी लक्ष्मीबाईंची आरती

राणी लक्ष्मीबाईंची आरती
जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
तांब्यांच्या घराण्यातील तू शूर मनु देवी .
नानासाहेब,तात्या टोपे हे तुझे सोबती देवी
ह्या स्वातंत्र समरी .................

जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
" झाशी " हे राज्य आहे तुझे देवी
मराठ्यांच्या कुळात तू वाढलीस देवी
संस्कार युद्धाचे दिधले तुला पेशव्यांनी
छत्रपतींचे बळ अंगी आहे तुझ्या देवी

जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
शौर्याचे वरदान ,स्वातंत्र्याचे प्रेम दिधले तू देवी
यवन नाशिनी स्वातंत्र्यदेवता तू देवी
मर्दानी राणी ,अग्निज्वाला दघ्द करशी यवननराधमा
मातले पांढरे त्यांना तू मारिले !

जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी
रणशिंग फुंकले १८५७ ला देवी तुझ्या सोबत्यांनी
मी माझी झाशी देणार नाही असे ठणकाउन सांगितले
तू देवी त्या श्वेतम्लेछान्सी
पुत्राला बंधूनी पाठीशी लढलीस तू देवी
अमर होऊनी आमच्या मनात राहिलीस देवी

जय देवी जय देवी राणी लक्ष्मीबाई
स्वातंत्रदेवते तुझ घालूनी नमन
हिंदुस्तानचा इतिहास आठवी !
तू दुर्गेचा अवतार वाटसी देवी

तुला लक्ष्य प्रणाम देवी !

नथूराम वि. गोडसे मृत्युपत्र .....

नथूराम वि. गोडसे मृत्युपत्र .....

April 10, 2012 at 3:34pm
मृत्युपत्र

प्रिय बंधो दत्तात्रय वि. गोडसे

माझ्या विम्याचे पैसे आले तर त्याचा विनियोग घरच्या कामी करणे. रु.२०००
आपल्या पत्नीला, रु. ३००० गोपाळच्या पत्नीला आणि रु. २००० आपल्याला माझ्या
मृत्यूनंतर मिळावेत, असा मी विम्याच्या कागदपत्रांवर लेख केला आहे.

माझी उत्तरक्रिया करण्याच्या अधिकार आपणास मिळाल्यास कोणत्याही प्रकारे ते
काम करावे, परंतु माझी एकच विशेष इच्छा इथे लिहीत आहे.

जिच्या तीरावर प्राचीन द्रष्ट्यांनी वेदरचना केली ती सिंधू नदी आपल्या भारतवर्षाची
सीमारेषा आहे.

ती सिंधू नदी ज्या शुभ दिवशी पुन्हा भारातवर्षाच्या ध्वजाच्या छायेत स्वच्छंदतेने
वाहत राहील त्या दिवसात माझ्या अस्थींच्या रक्षेचा काही अंश त्या सिंधू नदीत प्रवाहित
केला जावा,

ही माझी इच्छा सत्यसृष्टीत येण्यासाठी आणखी एक-दोन पिढ्यांचा कालावधी
लागला तरी चिंता नाही.त्या दिवसापर्यंत तो अस्थींचा अवशेष तसाच ठेवा आणि आपल्या
आयुष्यात तो शुभदिवस आला नाही तर आपल्या वारसांना माझी इच्छा सांगत राहा.

माझे न्यायालयातील वक्तव्य शासनाने कधी बंधमुक्त केले तर त्याच्या प्रकाशनाचा
अधिकार मी आपल्याला देत आहे.
न्यायालयाची मुद्रा
नथूराम वि. गोडसे
१४-११-४९

अभिप्रमाणित (attested)
दंडाधिकारी , प्रथम वर्ग (स्वाक्षरी)

मी आज १०१ रुपये आपणास दिले आहेत ते आपण सौराष्ट्र सोमनाथ पुनरुद्धार
होत आहे, त्याच्या कळसाच्या कार्यासाठी धाडून द्यावेत.

नथुराम वि. गोडसे
१५-११-४९ : सुप्रभात ७l वाजता

बुडाला धर्म

बुडाला धर्म

May 13, 2012 at 11:18pm

पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती

जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती


बुडाला धर्म बदलली आपुलकी
राहिले फक्त अन्याय करणारी खोटी धर्मनिरपेक्षता
त्यांनी हत्या केल्या काश्मिरी पंडितांच्या , रोज मारिती गोमातेस ,
गोवंशास , आम्ही हात उगारला तर म्हणतात" तुम्ही दंगली करता "
पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती
शिवरायांचा चित्र आम्ही लावले तर आम्हाला अटक करतात
अल्ला मौलवींचे नाम जपतात .आपुल्याच राष्ट्रात शत्रूचा झेंडा फडकावतात
तरीही शासन गप्पच बसतात ....
हिंदूनेच निवडलेल शासन हिंदुनच डंख मारतय
धर्मनिरपेक्ष हिंदूच कारणीभूत याला .लक्षात घ्या
धर्मनिरपेक्षकांनो तुम्हीच केले खच्चीकरण तुमच्याच देशाचे धर्माचे
पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती
आम्ही काही बोललो कि म्हणतात हिंदू कट्टर वाद धोकादायक देशासाठी
असे तुम्ही बोलता तेंव्हा तुम्हीच असता खरे आतंकवादी , आजही कसबाला पोसता तुम्ही
आमच्याच मतांवर राज्य करता अमुच्यावर
हाय रे भाग्या ह्या धर्मनिरपेक्ष हिंदूंना अक्कल दे देवा !
पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती
जाती पातीत विभागले ह्यांनी आम्हास , आमचे बळ क्षीण करण्यासाठी
तेंव्हा तर तुम्हीच आहात देशद्रोही आणि धर्मद्रोही
दुष्काळात पर्यटन करुनी विचारांनी करता शेतकऱ्याला
खोटी आश्वासने देऊन बुडविता त्यांना .
पाण्यासाठी रडवून मृगजळ दाखवितात .....

गांधी हत्येचे कारण

गांधी हत्येचे कारण

July 11, 2013 at 1:41pm
गांधी हत्येचे कारण- नक्की वाचा ...
खून
खटल्याच्यावेळी न्यायमूर्ती खोसला यांनी नथुराम
गोडसे यांना त्यांचे निवेदन स्वतःच वाचावे
यासाठी परवानगी दिली होती. मात्र नथुराम
गोडसेंचे ते निवेदन भारत सरकारने प्रतिबंध
घालून प्रसिद्ध करण्यास मनाई केली होती.
या प्रतिबंधाच्या विरोधात नथुरामांचे भाऊ
आणि गांधी हत्येचे सहअपराधी गोपाळ गोडसे
यांनी ६० वर्षे न्यायालयीन लढाई केली.
परिणामस्वरूप सर्वोच्च न्यायालयाने हा प्रतिबंध
काढायला लावला आणि निवेदनाच्या प्रकाशनाला
न्यायालयात नथुराम गोडसे यांनी गांधीहत्येची जी १५० कारणे सांगितली होती. त्यांतली प्रमुख अशी --
1. अमृतसरच्या सन १९१९च्या जालियनवाला बाग हत्याकांडात झालेल्या नरसंहाराबद्दल जनरल डायर
यांना जबाबदार धरून त्यांच्यावर खटला चालवण्यात यावा अशी मागणी संतप्त जनतेकडून झाली होती. मोहनदास गांधी यांनी या मागणीला समर्थन देण्यास नकार दिला .
2. भगतसिंग राजगुरू आणि सुखदेव यांना दिलेल्या फाशी मुळे संतापलेली जनता गांधींकडे आशेनी बघत होती, की गांधीने यात हस्तक्षेप करून या तरुण देशभक्तांचे प्राण वाचवावे. पण गांधीनी भगतसिंहाच्या कृतीला अनुचित हिंसक
कार्यवाही म्हणून हस्तक्षेपास नकार दिला .
3. ६ मे १९४६ ला समाजवादी कार्यकर्र्त्यां­
च्या संमेलनात संबोधित करताना गांधीने मुस्लीम
लीगच्या हिंसेसमोर जनतेला आहुती देण्याचे
आवाहन केले होते.
4. महंमद अली जिना आणि इतर
राष्ट्रवादी मुस्लीम यांच्या विरोधाला न
जुमानता १९२१ मध्ये गांधीनी खिलाफत
आंदोलनाला आपले समर्थन जाहीर केले. तरी पण
केरळमध्ये मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारहाण
केली, आणि जवळ जवळ १५०० हिंदू ठार मारले
गेले आणि २००० हिंदूना बाटवून मुसलमान केले.
गांधीनी याचा निषेध न करता याचे वर्णन खुदा के बहादूर बंदो कि बहादुरी असे केले.
5. गांधींनी अनेक वेळा राजा छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, गुरु गोविंदसिंग यांना पथभ्रष्ट राष्ट्रभक्त म्हटले होते.
6. गांधीनी काश्मीरचे राजा हरिसिंग यांना काश्मीर मुस्लिम बहुल आहे म्हणून शासन सोडून काशीला जाऊन प्रायश्चित करण्यास सांगितले, आणि या उलट हैदराबादच्या निझामाला हैदराबाद हिंदू बहुल असूनही समर्थन दिले होते.
7. जिना यांना कायदे आझम ही उपाधी गांधींनीच
दिली होती
8. काँग्रेसच्या ध्वज निर्धारण समितीने १९३१
मध्ये चरखा अंकित असलेल्या भगवा रंगाच्या ध्वजाचा निर्णय घेतला होता, पण गांधींच्या हट्टामुळे ध्वज तिरंगी केला गेला
9. काँग्रेसच्या त्रिपुरा अधिवेशनात नेताजी सुभाषचंद्र बोस यांना बहुमताने अध्यक्ष
निर्वाचित केले गेले होते. पण गांधींचे समर्थन
पट्टाभि सीतारामय्या यांना असल्यामुळे
आणि सुभाषबाबूंनी त्यांना नेहमीनेहमी होणाऱ्या विरोधामुळे आणि गांधींच्या असहयोगामुळे राजीनामा दिला.
10. लाहोर काँग्रेसमध्ये पण सरदार वल्लभभाई
पटेल हे बहुमताने निवडून आले असूनही केवळ
गांधींच्या हट्टामुळे हे पद जवाहरलाल नेहरू
यांना दिले गेले.
१४-१५ जून १९४७ ला दिल्लीमध्ये
झालेल्या अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये
भारताच्या फाळणीचा निर्णय अस्वीकृत होणार
होता, पण गांधींनी तिकडे जाऊन ऐन वेळेस
विभाजनाला आपले समर्थन जाहीर केले.
या आधी त्यांनीच म्हंटले होते की विभाजन हे
माझ्या प्रेतावरच होईल .
11. जवाहरलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाने सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण सरकारी खर्चाने होणार हा प्रस्ताव पारित केला होता. पण गांधी हे मंत्रिमंडळाचे सदस्य नसताना देखील
त्यांनी हा प्रस्ताव फेटाळण्यास भाग पाडले,
आणि त्याच वेळेस दिल्लीमधील मशिदीची दुरुस्ती सरकारी खर्चाने व्हावी यासाठी १३ जानेवारी १९४८ ला उपोषण करून सरकारवर दबाव आणला.
12. पाकिस्तानातून आलेले हिंदू निर्वासितांनी जेव्हा मशिदीत तात्पुरता आसरा घेतला तेव्हा गांधीने लहान पोरे, महिला, वृद्ध अशा सर्वांना बाहेर काढून भर थंडीत रस्त्यावर राहण्यास भाग पाडले.
13. ऑक्टोबर १९४७ ला जेव्हा पाकिस्तानने
काश्मीरवर अचानक हल्ला केला तेव्हा पाकिस्तानला ५५ कोटी रुपये न देण्याचा मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाला आपला विरोध आहे हे
दाखवण्यासाठी गांधींनी परत उपोषण करून
ही राशी भारताच्या हिताविरुद्ध पाकिस्तानला देण्यास सरकारला बाध्य केले.
मृत्युदंड-
नथुराम गोडसे आणि सहआरोपी नारायण आपटे
यांना १५ नोव्हेंबर १९४९ ला पंजाबमधील
अंबाला जेलमध्ये फाशी देण्यात आले. त्यांचे
अंतिम शब्द असे होते, " जर आपल्या मातृभूमीसाठी भक्तिभाव ठेवणे पाप असेल तर मी ते पाप केले आहे, आणि जर मी हे पुण्य केले असेल तर या पुण्यावर मी माझा नम्र अधिकार आहे असे जाहीर करतो.!!
( नथुराम विनायक गोडसे यांचा जन्म १९ मे
१९१० ला भारताच्या महाराष्ट्र राज्यात
पुण्याजवळ बारामती येथे झाला होता.)

mothya prmanavar share kara...

बळीराजाच्या देशी आम्हा शेतकऱ्यांस किंमत नाही !

बळीराजाच्या देशी आम्हा शेतकऱ्यांस किंमत नाही !

May 13, 2012 at 11:21pm

जगण्याचा अंत प्रवाह ....
मनात येत राहून राहून ......
ग्लोबलायझेशन नावाची साथ पसरतेय वेगानं
आधीच सोलून निघालेल्या शेतकऱ्यांची दुखः पसरली सर्व देहावरती
समग्र शिन हलका केला आकाशातल्या काळ्या मेघांनी
माती जन्माची सोबती ,काय बाई जीव खाती
माणसांचा कोप करावा तसा हा पावसाळा
भोगवादी राजकारणी अडवितात आमुचे पाणी
इथ रामा सारखा कार्यकर्ता मातीआड झाला .
पवनेच पाणी गेल .नशिबी मृत्यू आला ..
शेतकऱ्यांचे कष्ट पाहवत नाही शेतजमीन गेली
धरणांच्या उत्पतीसाठी ..आम्हावर पोलिसांनी गोळीबार केला .
नाही आला कुणी राजकारणी मदतीसाठी
.शेवटी काळाल बळीराजाच्या देशी आम्हा शेतकऱ्यांस किंमत नाही !

हिंदुस्तानाला नितीमत्तेची उणीव भासत आहे

हिंदुस्तानाला नितीमत्तेची उणीव भासत आहे

October 23, 2013 at 2:06pm
ज्या  लोकांच्या गरजा कमी असतात , जे कोणत्याही अमिषाला बळी पडत नाही त्यांना कुणाचा बाप हि विकत घेऊ शकत नाही किंवा ते कोणत्याही दबावाला जुमानत नाहीत ……।

माननीय दिवंगत पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी महाशक्ती  अमेरिकेच्या दबाव तंत्राला बळी न पडता , अन्न धान्याची टंचाई असलेल्या काळात स्वत पासून फक्त एक वेळ जेवण करण्याचा जो निर्णय घेतला तो मोहनदास गांधींच्या सत्याग्रहाच्या निर्णयापेक्षा कित्त्येक पटीने महान होता ! त्याच नीतिमत्तेच्या आणि हिंदुस्थानी जवानांच्या शौर्याने पाकिस्तानचा पराभव केला .......
आज  त्या  नितीमत्तेची हिंदुस्तानाला   उणीव  भासत आहे ……कारण ती नित्तीमत्ता आज कालच्या सत्ताधीशांमध्ये ०.००००००००१% एवढी सुद्धा राहिली नाही आहे .


लालबहादूर शास्त्री (रोमन लिपी: Lal Bahadur Shastri) (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून, इ.स. १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात इ.स. १९६५सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले. सोव्हियेत संघाच्या मध्यस्थीने पाकिस्तानबरोबर युद्धबंदीचा ताश्कंद करार करण्यासाठी ताश्कंद (तत्कालीन सोव्हियेत संघात, वर्तमान उझबेकिस्तानात) येथे दौऱ्यावर असताना ११ जानेवारी, इ.स. १९६६ रोजी यांचा हृदयविकाराचे दोन झटके येऊन मृत्यू झाला.

जीवन
२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ साली वाराणसी येथे एका गरीब, प्राथमिक शिक्षकाच्या घरी त्यांचा जन्म झाला. ते दीड वर्षांचे झाले तेव्हा त्यांचे वडील निधन पावले. माता रामदुलारी आपल्या मुलांना पदराखाली घालून माहेरी आली. प्राथमिक शिक्षण मिर्झापूर येथे तर माध्यमिक शिक्षण वाराणशीला झाले. तेथे त्यांना निल्कामेश्वर प्रसाद असे पितृतुल्य गुरू भेटले. त्यांनी  लोकमान्य टिळक, लाला लजपतराय यांच्या जीवनदर्शनाचे तज्ञ्ल्त्;व त्यांना समजाविले.
वयाच्या अकराव्या वर्षी बनारस हिंदू विश्वविद्यालयाची किनशिला बसविण्यासाठी आलेले गांधीजी त्यांना दिसले. तिथे त्यांच्या गाजलेल्या भाषणाने ते भारावून गेले. मग त्यांनी गांधीजींची पाठ सोडली नाही. चंपारण्य सत्याग्रह, रौलेट अ‍ॅक्ट, जालियनवाला हत्याकांड इत्यादी घटनांचे प्रतिसाद त्यांच्या मनात घर करून बसले. विदेशीवर बहिष्कार, स्वदेशीचा वापर यातच लालबहादूर गुंतले व त्यातून सुटताच पुन्हा विद्यापीठात दाखल झाले. काशी विद्यापीठाचे 'शास्त्री' झाले.( त्यांचे मूळ आडनाव 'श्रीवास्तव' हे होते.) 'सर्व्हटस ऑफ दि पीपल्स' सोसायटीचे सदस्य झाले. शैक्षणिक आणि सामाजिक सुधारणा हे त्यांचे ध्येय होते. समानतेचे सूत्र होते. इ.स. १९२८ साली लाला लजपतराय गेले व पुरूषोत्तमदास टंडन सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते अलाहाबादला दाखल झाले. त्यांचीच अध्यक्ष म्हणून निवड झाली. विधायक कार्यकत्र्यांची ती पाठशाळाच होती. आचार्य नरेंद्र देव, आचार्य कृपलानी, डॉ. भगवानदास, डॉ. संपूर्णानंद, श्रीप्रकाश यांचा परिचय व मैत्री झाली.
नेहरू, शास्त्रीना कॉंग्रेसचे मवाळ धोरण मान्य नव्हते. इ.स. १९३७ मध्ये सत्याग्रह करून ते कारावासात गेले. सत्तेची लालसा नव्हती; पण इ.स. १९४६ साली निवडणुका झाल्या. ते गोविदवल्लभ पंतांचे सेेक्रटरी झाले. पंत गेल्यावर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. इ.स. १९५१ साली मध्ये त्यांनी पं. जवाहरलालजींनी त्यांना काॅंग्रेसचे सचिव केले. इ.स. १९५६ साली त्यांना रेल्वेमंत्रीपद दिले. पण एका अपघाताची नैतिक जबाबदारी घेऊन त्यांनी त्या पदाचा राजिनामा दिला. इ.स. १९५७ मध्ये त्यांनी कॉंग्रेसला निवडणुका जिंकून दिल्या. २७मे, इ.स. १९६४ला नेहरू गेले. त्यानंतर लालबहादूर एकमताने पंतप्रधान झाले. पाकिस्तानला ही सुसंधी वाटली. पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. 'जय जवान, जय किसान' हा घोषणामंत्र वातावरणात निनादला. भारताने पाकिस्तानला नमविले. [युनो]]ने युद्धबंदी केली. रशियाने मध्यस्थी केली. १० जानेवारी, इ.स. १९६६ रोजी ह्रदयविकाराच्या तीव्र झटल्याने त्यांची जीवनज्योत मालवली. त्यांनी देशासाठी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले.

मृत्यूविषयी प्रवाद
शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली. इ.स. २००९ साली अरूण धर यांनी माहितीहक्काच्या कायद्यानुसार पंतप्रधान कार्यालयाकडे शास्त्रींच्या मृत्यूचे कारण जाहीर करण्याची विनंती केली. पण पंतप्रधान कार्यालयाने ही विनंती फेटाळून लावली. त्यासाठी कारण देताना यामुळे आपले इतर देशांशी असलेले संबंध बिघडण्याची शक्यता, देशात हिंसाचार उफाळून येण्याची शक्यता आणि संसदेच्या विशेषाधिकाराचा भंग होऊ शकतो असे नमूद करण्यात आले. पंतप्रधान कार्यालयाने शास्त्रींच्या मृत्यूबाबत एक दस्ताऐवज आपल्याकडे असल्याचा दावा केला, मात्र तो उघड करण्यास नकारही दिला. तसेच त्यावेळच्या सोवियत रशियाने शास्त्रींचे पोस्टमॉर्टेम न केल्याचे मान्य केले. पण, शास्त्रींचे वैयक्तिक डॉक्टर आर. एन. चुग आणि काही रशियन डॉक्टरांनी केलेल्या तपासणीचा अहवाल आपल्याजवळ असल्याचे मान्य केले. आपल्याकडील कोणताही दस्तऐवज नष्ट केलेला नाही वा गहाळ झालेला नाही हेसुद्धा पंतप्रधान कार्यालयाने नमूद केले. मात्र भारताने त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमॉर्टेम केले वा नाही, तसेच शास्त्रींच्या मृत्यूबाबत कोणतीही दुर्घटना घडवून आणण्यात आली होती वा कसे याबाबत कोणतीही प्रतिक्रिया जुलै, इ.स. २००९ पर्यंत तरी गृहमंत्रालयाने दिलेली नाही.