शुक्रवार, १८ मे, २०१२

बळीराजाच्या देशी आम्हा शेतकऱ्यांस किंमत नाही !

जगण्याचा अंत प्रवाह ....
मनात येत राहून राहून ......
ग्लोबलायझेशन नावाची साथ पसरतेय वेगानं
आधीच सोलून निघालेल्या शेतकऱ्यांची दुखः पसरली सर्व देहावरती
समग्र शिन हलका केला आकाशातल्या काळ्या मेघांनी
माती जन्माची सोबती ,काय बाई जीव खाती
माणसांचा कोप करावा तसा हा पावसाळा
भोगवादी राजकारणी अडवितात आमुचे पाणी
इथ रामा सारखा कार्यकर्ता मातीआड झाला .
पवनेच पाणी गेल .नशिबी मृत्यू आला ..
शेतकऱ्यांचे कष्ट पाहवत नाही शेतजमीन गेली
धरणांच्या उत्पतीसाठी ..आम्हावर पोलिसांनी गोळीबार केला .
नाही आला कुणी राजकारणी मदतीसाठी
.शेवटी काळाल बळीराजाच्या देशी आम्हा शेतकऱ्यांस किंमत नाही !

धर्मनिरपेक्ष

  • पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
    जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
    स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
    धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती

    बुडाला धर्म बदलली आपुलकी
    राहिले फक्त अन्याय करणारी खोटी धर्मनिरपेक्षता
    त्यांनी हत्या केल्या काश्मिरी पंडितांच्या , रोज मारिती गोमातेस ,
    गोवंशास , आम्ही हात उगारला तर म्हणतात" तुम्ही दंगली करता "

    पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
    जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
    स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
    धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती

    शिवरायांचा चित्र आम्ही लावले तर आम्हाला अटक करतात
    अल्ला मौलवींचे नाम जपतात .आपुल्याच राष्ट्रात शत्रूचा झेंडा फडकावतात
    तरीही शासन गप्पच बसतात ....
    हिंदूनेच निवडलेल शासन हिंदुनच डंख मारतय
    धर्मनिरपेक्ष हिंदूच कारणीभूत याला .लक्षात घ्या
    धर्मनिरपेक्षकांनो तुम्हीच केले खच्चीकरण तुमच्याच देशाचे धर्माचे

    पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
    जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
    स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
    धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती

    आम्ही काही बोललो कि म्हणतात हिंदू कट्टर वाद धोकादायक देशासाठी
    असे तुम्ही बोलता तेंव्हा तुम्हीच असता खरे आतंकवादी , आजही कसबाला पोसता तुम्ही
    आमच्याच मतांवर राज्य करता अमुच्यावर
    हाय रे भाग्या ह्या धर्मनिरपेक्ष हिंदूंना अक्कल दे देवा !

    पत्ता नाही अमुचा कोठेच या जगती
    जिथे जाऊ तिथे अमानुषतेला पाय फुटती
    स्थिर नाही "धर्म " राहून अधर्माच्या संगती
    धर्मनिरपेक्ष स्वतास संबोधती

    जाती पातीत विभागले ह्यांनी आम्हास , आमचे बळ क्षीण करण्यासाठी
    तेंव्हा तर तुम्हीच आहात देशद्रोही आणि धर्मद्रोही
    दुष्काळात पर्यटन करुनी विचारांनी करता शेतकऱ्याला
    खोटी आश्वासने देऊन बुडविता त्यांना .
    पाण्यासाठी रडवून मृगजळ दाखवितात ......

Z-BRIDGE

तीच लग्न होऊन, आता २ महिने उलटून गेले..
रडून-रडून अश्रू संपले.. आता डोळे सुद्धा सुकून गेले..
तिनं अस का केलं ? उत्तर काही मिळणार नाही..
आता आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

नसेल जाण, तर गेली उडत.. मी खैर करणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

पहिल्यांदा CANTEEN मध्ये पाहिलं तिला, च्यायला काय दिसत होती...
अरे KATRINA सुद्धा झक मारेल मित्रा, अप्सरा जणू भासत होती..
मी 'आ' वासून बघत राहिलो... तसं अख्खं कॉलेजच 'चाट' पडलं होतं..
माझ्या त्या BORING LIFE मध्ये, काहीतरी INTERESTING घडलं होतं..

पण.. आता हा सलमान, आठवणीत तिच्या, रात्रंदिवस झुरणार नाही..
आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

SCIENCE क्लासमध्ये ओळख झाली, अन् चक्क ती माझ्या नजदीक आली,
DARING करून 'मारला' PROPOSE... ती लाजून 'इश्श' म्हणाली..
( ती तिकडे 'इश्श'.. आम्ही इकडे 'खुश्श'.. ;-D )
अहो काय SIXER मारली होती आपण?..'युवी'ने सुद्धा सलाम ठोकला असता..
पण चुकून नाही म्हणाली असती.. सांगतो.. माझा YORKER हुकला असता..
अहो.. पण प्रेम म्हणजे काय .. 'T20' MATCH वाटली का तिला??.. की झटपट उरकून गेली..
जन्मभराची 'कसोटी'... पण स्वतः 'RETIRED' आणि मला 'HURT' करून गेली..

पण माझी HIT-WICKET पुन्हा कोणी, आता जन्मात घेऊ शकणार नाही..
कारण.. आई शप्पथ सांगतो.. परत प्रेमात पडणार नाही..

सारस-कात्रज बाग तर सोडाच... आम्ही Z-BRIDGE सुद्धा सोडला नाही..
खर तर वडा-पाव चे वांदे.. पण मी.. चकार शब्द सुद्धा काढला नाही

कधी तू रिमझिम झरणारी बरसात

कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत
कधी तू ................
कोसळत्या धारा
थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात
सळसळत्या लाटा
भिजलेल्या वाटा
चिंब पावसाची ओलीरात
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
कधी तू चम चम करणारी चांदण्यांत
कधी तू अंग अंग मोहरणारी
आसमंत दरवळणारी
रातराणी वेड्या जंगलात
कधी तू हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात
जरी तू कळले तरी ना कळणारे
दिसले तरी ना दिसणारे
विरणारे मृगजळ एक क्षणांत
तरी तू मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू रिमझिम झरणारी बरसात.....

जिंका आणि नेहमी जिंकताच राहा

वाईट वेळेच चांगुल पण आहे की ती वेळ सुद्धा नष्ट होते . आणि चांगल्या वेळेचे वाईट पण आहे चांगली वेळ सुद्धा संपते .....शुभ प्रभात ..जिंका आणि नेहमी जिंकताच राहा ...हिमालय चढता नाही आला म्हणून निराश होऊ नका .......कदाचित हिमालयाच भाग्य खराब असेल कि तुमचे पाय तेथे लागले नाहीत ....

फक्त एकदाचं..


कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन
घ्यायचेय,
पण त्यासाठी तू माझ्यासोबत
असायला पाहिजे.
तुझ्या जिवनातले सगळे रहस्य उलगडुन
घ्यायचेय, पण
त्यासाठि तु माझ्याबरोबर गप्पा मारत
बसायला पाहिजे.
कधितरी तुझ्या मनातले सारे काही जाणुन
घ्यायचेय,
पण त्यासाठि तु माझ्यावर विश्वास
टाकायला पाहिजे.
तुझ्या जिवनातल्या प्रत्येक क्षणांमध्ये
मला जगायचेय,
पण त्यासाठि त्या क्षणात तु मला नेले
पाहिजे.
जास्त नाही मागत तुझ्याकडुन.
फक्त तुझे मन, तुझे क्षण, तुझे दुःख,
एवढेच जाणुन घ्यायचेय, आणि
त्यासाठि माझ्या मनातुन एकच वाक्य
निघतेय.
फक्त एकदाचं.......
फक्त एकदाचं.......
तुझ्या मनातले सारे काही जाणून घ्यायचेय,
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन
तासनतास् बसायचेयं...
निदान त्यासाठी तरी नजरेला नजर भिडवुन
तासनतास् बसायचेयं.

शप्पथ तुझ्या प्रेमाची .


Super-Like ♥ लिहिलय
जरूर वाचा,
"फक्त आपल्या आईसाठी"
मी पाहिलेलं आहे एका आईला......... :'(
मी पाहिलेलं आहे एका आईला..............
.
सुरकुत्या चेहऱ्यावर
ओघळणारे अश्रू पाहिलेत मी........
.
त्या दोन आसवांत
दडलेला दुखः ऐकलय मी........
.
भान विसरून
मुलाचे कौतुक करताना पाहिलंय मी.........
.
क्षणभर स्वताःला तू विसरलेलं पाहिलंय
ग मी........
.
मध्येच भानावर येताना पाहिलंय मी
तुला........
.
माउलीला घराबाहेर
मुलाने काढताना पाहिलंय मी.......
.
माउलीला रात्र रात्र
अन्नासाठी वण-वण करताना पाहिलंय
मी........
.
माउलीला रोज शिळ
खाताना आणि मुलाला ताज देताना पाहिलंय
मी........
.
माउलीला रडताना पाहिलंय मी...... :'(
.
कसला रोग झालाय ह्या नव्या पिढीला देवं
जाणे............
मराठी मुलं ही आई-बापाला घराच्या बाहेर
काढू लागली आहेत
आणि वृद्धाश्रमात पाठवू
लागली आहेत............
कळू दे सगळ्यांना
ज्यांनी लहानाचा मोठा केला त्यांना तू घर
बाहेर काढत असशील ना तर
थू तुझ्या आयुष्यावर..........
............................शेयर करायला विसरू नका.

कुंकू,


भारतीय स्त्रियांच्या कुंकवाला फार महत्व आहे.........

पूर्वीच्या काळी स्त्रिया कपाळाच्या मध्यभागी कुंकू लावायच्या. त्याच्यापाठीमागे काही शास्त्रीय कारण आहे. फक्त
स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनी देखील कपाळाला गंध
लावणे अपेक्षित आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया पिंजर
लावायच्या. साधारणपणे लाल, चॉकलेटी किंवा मरून रंगाची पिंजर जास्त प्रमाणात
वापरली जायची. पूर्वीच्या काळी स्त्रिया चंद्रकोर लावायच्या.

हिंदू धर्मात स्त्रीचं सौभाग्य कपाळावर लावलेल्या कुंकवामुळे समजतं. कोणत्याही
लग्न झालेल्या स्त्रीने कपाळावर कुंकू लावावं, असा अलिखित नियम आहे. हिंदू
धर्मात कपाळावर कुंकू, हातात हिरव्या बांगड्यांचा चुडा आणि गळ्यात मंगळसूत्र
हे तीन सौभाग्यालंकार मानतात.

हल्लीच्या सगळ्याच गोष्टींवर चित्रपट आणि सिरियल्सचा खूपच प्रभाव होत
चाललेला दिसतो. मग त्यातून टिकल्या कशा काय सुटतील? म्हणूनच आज
असंख्य प्रकारांच्या, आकाराच्या, रंगाच्या लेटेस्ट फॅशनच्या फॅन्सी टिकल्या
लावण्याचा स्त्रिया आणि तरुण मुलींमध्ये ओघ दिसून येतो.

अलीकडच्या फॅशनच्या युगात कपड्यांच्या लेटेस्ट स्टाइलमुळे नवीन लग्न
झालेल्या मुली टिकली लावत नाहीत. जीन्स, टी-शर्ट घातल्यावर टिकली
सूट होत नाही असं त्यांचं म्हणणं असतं. पण जर लग्न समारंभात
साडीवर, शरारा अशा कपड्यांवर टिकलीशिवाय कोणत्याही
स्त्रीच्या सौंदर्याला उठाव येत नाही.

हल्ली प्रत्येक गोष्टींमध्ये फॅशनचा
शिरकाव झाल्यामुळे, त्याच्या
नावाखाली अनेक नवीन-नवीन
वस्तू बाजारात येत आहेत.
अशाच या फॅशनच्या युगात
ड्रेसवर किंवा साडीवर
लावण्यासाठी वेगवेगळ्या
प्रकारच्या, आकाराच्या
आणि रंगाच्या अनेक टिकल्याही
बाजारात आल्या आहेत. काही
स्त्रिया अगदी छोटी टिकली लावतात,
काही कपाळभर मोठ्ठ कुंकू लावतात
तर काही जणी पूर्ण मळवट भरतात
अगदी ह्या काळातदेखील.

टिकली किंवा बिंदी
हा स्त्रीचा सौभाग्याचा अलंकार आहे आणि त्यामुळे स्त्रीच्या
सौंदर्यात नक्कीच भर पडते.
— with Milind Vaidya.