या आधी कधी नव्हती घडलेली .
जिला कधी येत नव्हते गाता ..
तिच्या जिभेवर सरस्वती नाचू लागली आता
वेली हलून हलून कुज बुजू लागल्या ...
रातकीड़े आता गप्प बसले ,
अन्धारामध्ये जसे अगणित काजवे चमकले
हिरयाचा तो प्रकाश सर्वत्र पसरला
क्षणामध्ये कुबेर प्रसन्न झाला.
गणिताच्या अंकांचे शत्रुत्व संपले आता.
मैत्रीच्या आनंदाने दुःख हरवले
ऐसेच गीत होते तिचे काव्यं मधुनच तिने उधळली सुमन सहस्त्र ..
लक्ष्मी च्या पावलाने घरामध्ये ती आली
अंधाऱ्या काळोखाला प्रकाशामध्ये रूपांतरित केले
सायंकाळी तुळशिला दिवे लावले
प्रेमा मध्ये रति , युद्धामध्ये भवानी ,
जिचे ऐश्वर्य होते इंद्रासमान ऐशी एक स्त्री आली
माझ्या आयुष्यात .........................
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा