शुक्रवार, ३ जुलै, २०१५

सारडे गाव

सारडे हे रायगड जिल्ह्याच्या उरण तालुक्यातील गाव आहे. तालुक्याच्या पूर्व विभागात वसलेल्या या गावात मुख्यत्वे आगरी समाजाची वस्ती आहे. येथून जवळच असलेले भंगारपाडा हा याचा ग्रामपंचायतीचा एक भाग आहे.
भंगारपाड्यात 'कराडी' समाजाची वस्ती आहे. गावाच्या दक्षिणेस 'श्री बहिरी देवाचे मंदिर' आहे त्या भागाला 'उघड' म्हणतात.
गावाच्या पूर्वेस आणि पश्चिमेस डोंगर रांगा आहेत. पूर्वेच्या डोंगर रांगा दक्षिणेला 'कडापे' ह्या आवरे गावातील एका भागापर्यंत पसरलेल्या आहेत. या दोन्ही पुर्व आणि पश्चिमेच्या डोंगरांच्यामध्ये येथे 'तांदळांची शेती' मोठ्या प्रमाणात करतात.

तसेच भंगारपाड्यापासुन वाहणारी खाडी उघडीरुन
 पुढे जाऊन पातळगंगा नदीच्या खाडीस जाऊन मिळते.
येथील पुर्वेकडिल डोंगरात जेथुन पाण्याचे झरे आणि ओढे वाहतात त्या भागाला 'घोल' म्हणतात .जेथे पावसाळ्यात पंचक्रोशितले पर्यटक आंघोळ करण्यास येतात,
येथे पवित्र देवता किंवा देवकन्या वास करतात असे मानले जाते,त्यांना गावातिल लोक 'बाया'असे म्हणतात .
तर घोलाच्या पुर्वेला' कोमनादेवी डोंगरावर' 'कोमनादेवी' प्रगट झाली आहे जी पाषाण रुपात येथे निवास करते. गावाच्या आख्यायिकेनुसार देवी पिरकोन गावातील एका भक्ताच्या स्वप्नात आली होती तिने स्वप्नांत दृष्टांत देऊन सांगितले मला मुक्त राहु दे .त्यामुळे तेथे अजुन मंदिर बांधले गेले नाही,परंतु सारडे पिरकोन गावातिल भक्तांसाठी तिचे महत्व अपरंपार आहे.येथे येणारे पर्यटक देवीचे दर्शन जरुर घेतात.हि देवता येथे प्रचंड प्रिय असुन तिच्या रिक्षा चालक भक्तांनी स्वतःच्या वाहनांवर कोमनादेवी प्रसन्न हे तिच्या कृपेचे प्रतिक म्हणुन लिहिले आहे.
'स्वप्निल पाटिल आणि सुशांत माळी 'यांनी सारडे गावची श्री कोमनादेवी,श्री राधाकृष्ण आणि श्री हनुमान यांना समर्पित ध्वनिमुद्रिका 'नटखट कान्हा' ह्या गावातिल ग्रुप तर्फे बनविली आहे.
'सारडे विकास मंच'नावाची संघटना 'श्री नागेन्द्र म्हात्रे' यांच्या नेतृत्वाने गावातिल विविध सामाजिक कार्य करित आहे ,विषेशत:गावातिल लहान मुलांपासुन तरुण वृद्ध व्यक्तिंनी सारडे विकास मंच च्या स्वच्छता मोहिमेला प्रचंड प्रतिसाद दिला आहे. तसेच समाज कार्य करण्यावर देखिल संघटना भर देत आहे.
सण :- गोपाळकाला सारडे गावातील प्रमुख सण आहे,त्याच बरोबर होळी ,दसरा,दिवाळी आषाढी एकादशी हे सण सुद्धा आहेत.
गाव टेकडीवर वसलेले असुन एकमेकांपासुन जवळ घरे बांधली आहेत. वरती राधाकृष्णाचे मंदिर आहे जेथे मंदिराबरोबर सभामंडपसुद्धा आहे श्रीकृष्ण आणि राधेची मोहक मृर्ती आहे त्याच बरोबर हिंदु धर्मात पवित्र मानलेल्या गाईची देखिल मृर्ती आहे.श्री राधाकृष्ण देवता संपुर्ण गावचे श्रद्धास्थान आहे. बह्वंशी येथिल बहुतेक लोक मुंबई ,नविमुंबई,उरण ,पनवेल ,पेण येथे राहतात क्वचित काही एक घराणे अमेरिकेत स्थलांतरीत झाली आहेत तर काही नोकरीच्या निमित्ताने दुबई, दक्षिण ऑफ्रिकेत ,टांझानिया येथे जाऊन आले आहेत.परंतु त्यांनी गावातिल त्रुणानुबंध अजुनही कायम आहे.गोपाळकाळा आणि गणपतीला गावाबाहेर राहणार्या व्यक्ति दरवर्षी येतात.
आरोग्य:- तरी गावात एक हि दवाखाना, मेडिकल स्टोअर्स किंवा हॉस्पिटल नाही आहे.आरोग्यविषयक बाबींसाठी संपुर्ण गावाला इतरस्त जावे लागत आहे हे भयानक वास्तव आहे,येथे शेतकर्यांना खाडीपार करणारा पुल कोसळला आहे त्यामुळे पलीकडे जायचे असेल तर खाडीतुन जावे लागते किंवा वहातुकीच्या पुलावरुन पलीकडे जावे लागते.गावातिल बहुतेक तरुण मंडळी गोडाऊन मध्ये काम करतात,काही जे.एन.पि.टी. मध्ये परंतु अवजड जड माल वहातुकदारांच्या बेजबाबदार वाहने चालविल्या मुळे बरेचसे अपघात होतात.
पाणी व्यवस्था :- बहुंताशी पाणीपुरवठा पुनाडे धरणातुन होतो,परंतु जेंव्हा खंडित होतो तेंव्हा गावातिल सार्वजनिक विहीरी आणि घोलातील असलेल्या डोर्यांवर अवलंबुन रहावे लागते ,तेथे पाण्याचा उपसा झाला तर बाभळीवर तेथे नसेल तर थेट चोंडीवर जावे लागते.
विज व्यवस्था :-नेहमी प्रमाणे भार नियमन चालु असते ,खुप वेळा गावातिल लोकांना अंधारात रहावे लागते विशेषत:पावसाळ्यामध्ये कारण दरवर्षी येथे बिघाड होतोच

सोमवार, ९ मार्च, २०१५

मराठी

मि #ट्विटर वरती #आंतरराष्ट्रीय_मराठी_भाषेचा येथेच्छ वापर करतो आणि मराठी येत नसलेल्या निरक्षरांना शिकवतो आणि आपण?
अजुनही ७२०कोटी लोकांना मराठी येत नाही !

तलवार

#समशेर ही तलवार आपुली #धारदार
मस्तवालांना करू विरोध जो करी अत्याचार #प्रजेवरी
तात्काळ करू बंदिस्त त्याला दादागिरी जो करी #मराठी_माणसांवरी!

 असो कुणी #मोठा_भांडवलदार ज्याचा #डोळा तुमच्या #अर्थावरी #भुमिवरी एकत्रित येऊ आणि दाखवून देऊ त्याला एकतेचे बळ !

आक्रमण जाहले आमुच्या #भाषेवरी #भुमिवरी
#जमिनी_आमुच्या_आणि_रोजगार_व्यवसायाच्या_संधी_त्यांना #नक्की_कोण_करितय_घात_आपुला 

#भुमिपूत्रान्ना महाराष्ट्रात काहीच #किंमत नाही 
#विषपान करिती येथिल #शेतकरी 
सुशिक्षित बेरोजगार येथील #भुमिपूत्र आणि 
संधी मिळवी परकीय 
प्रजासत्ताक राष्ट्रात भुमिपूत्रांचा होई काळ?

उगारीली आम्ही तलवार तर ते आम्हाला म्हणी देशद्रोही
खरे देशद्रोही कोण ?
जे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आमच्यावरी अन्याय करितात तेची
आहेत गुन्हेगार खरोखर !

लेखनीला मिळो बळ आई सरस्वतीचे सामार्थ्य अगाध
श्री गणेश तोची शुभकर्ता 
म्हणे धीरज मराठीच्या बळे समग्र विश्व हलो

मराठी राष्ट्रभाषेला त्रिवार नमस्कार

वाट अडविणारे

#महाराष्ट्रात अशी काही #मराठी_मंडळी आहेत जी ईतर #मराठी_माणसांना पुढे जाऊन देत नाहित म्हणुन ते सतत मराठी माणसांना #डावलत आणि #दुषणे देत असतात आणि त्यांच्या संधी #हिसकाऊन घेत स्वतःची #पुर्वग्रह_दुषित नजरेने स्वतःची #नसलेली #बुद्धी पाजळत असतात अश्या #निराशावादी  #संधीसाधु लोकांस #लबाड_कोल्हे म्हणतात .
#छत्रपती_शिवाजी_महाराजांनी कोल्ह्या लांडग्यांची शेपुट आणु देणार्या #मावळ्यांना बक्षिस दिले होते !
आता ह्या #लांडग्या_कोल्हयांचे काय करायचे ?

रविवार, २५ जानेवारी, २०१५

हिंदू वंश राष्ट्र

तस पाहायला गेल तर हा ब्लॉग मी फक्त आणि फक्त
जगामध्ये जे सतत होणारे बदल आणि व्यक्तींची बदलणारी मानसिकता
१२५ कोटी हिंदू वंशाच्या लोकांच्या राष्ट्राच्या कल्याणासाठी समर्पित आहे




विशेष करून हिंदू वंशात अल्प आणि जमीन हीन झालेल्या आगरी कोळी लोकांचे कष्ट कसे दूर करता यावेत याचा विचार मी सतत करीत असतो




आदिवासींमध्ये लोकांना पांढरपेशी समाजात सर्वोच्च स्थाःन  कसे प्राप्त होऊ शकेल त्या साठी कश्या प्रकारे आपण एकमेकांच्या मदतीने यातून मार्ग काढू शकतो 




आणि त्या मार्गाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करून आपले उचित ध्येय प्राप्त व्हावे हा माझा  ध्यास आहे