रविवार, २७ जुलै, २०१४

विद्रोह

आगरी भाषेतील
 विद्रोह कविता 


आज आयलाय पाऊस माजे दारान जसा मोराचा नाच , तान्हे बाला चा हसना
आथा बरसतंय आइसा जैसा सोसाट्याचा वारा


एन. एम. टी. बस भिजलीय आथा सगळ्या लोखांना चाहूल लागली घरची गावांची
जुना गाव कसला व्हता सोन्या सारखा  गरीबांचा घर ,बैलगारी सरकव चालाच्या
अविकसित होतु  पुन गाई म्हशी दुध दुभात्यान भरलेला गाव व्हता शेणानी सारवलेला आमचा घर व्हता


आथा शेर झायालय इथ आमचे गावाचा गावठाण झाला
नाय रायालीय जुन्यांची मजा

 सिरको तोराला बसलीय आमचेच जमिनीन वारावलेली घरा
आमचा जुना गाव बारा होता माणुसकी होती सगल्यांना आथा नुसताच झगर होतान

उम्बय जेली थाना जेला आथा नवी उम्बाय पुन जाईल हातांशी
परक भय्ये येवून बसलं आमचे छाताराव   
   
    इखन्चा आमदार आगरी-कोली खासदार आगरी-कोली पुन
आथा आगरी कोलीच परक्यांचे गर्दीन दिसानसा झाला
आगरी कोल्यांचा समिंदर सुद्धा हातांशी  जेला 


कसा घरावावा भविष्य पोराबालांचा
आमीच इथले भूमिपुत्र पाहिलं तरी आमचा वाटोळा झाला
बाहेरचे भय्यांनी घेतला आमचा मच्छीचा धंदा
सरकारांनी आमची जमीन कमी भावान जबरदस्तीन   हिसकावून घेतली

आथा आमालाच येरण कारथान बायेराची माणसा
आमचे भाषेला हसतान , आमचे संस्कृतीला हसतान
आथा बस झाला सारा आथा वेल आली
संघटीत  रावून विद्रोह कराची  आमाला हसाल येरन कराल तर खबरदार!
 इथुनशि बायेर सोरणार नाय  अन्याव केलाव तर जीत सोरणार नाय !
काह्यान गेल माझ आगरी कोली भूमी पुत्र ?
कला भांडता व आपसान याचंच त फायदा घेतान राजकारणी लोख
बायेर च न सरकार

एकीच बल जाम भारी  दादुस 'एक रायालू तर कनचे शाहनचि आपले वाटला जावाची हिम्मत नाय !  

मंगळवार, २२ जुलै, २०१४

आगरी कोळी संस्कृती

एखादी संस्कृती स्थापित होण्यास जसे शतकानुशतके लागतात
त्याच प्रमाणे निसर्ग स्थापित होण्यास अब्जावधी वर्षे लागली असतील
निसर्गाचा ह्रास करून माणूस फार काळ टिकेल असे वाटत नाही कदाचित त्याचा सुद्धा  डाय नोसोर होईल !
तसे पाहता निश्चित पणे आगरी कोळ्यांनी स्वताची संकृती वसविताना निसर्गाशी मिळते जुळते घेतल्याने आजही त्यांची संकृती टिकून आहे .
कित्येक परकीय समुद्री चाचे हिंदू महासागरावर आधिपत्य गाजविण्याच्या मोहिमेत अपयशी ठरले ,खूप कमी जनांना यात यश मिळाले
हिंदुभूमिशी प्राचीन काळापासून अनेक परकीय  व्यापारी व्यापार करण्यास आले
परंतु या भूमीला लुटण्यास जसे जमिनीवरून गझनीचा सुलतान आला त्याच प्रमाणे समुद्री मार्गे पोर्तुगीज ,डच ,इंग्रज ,फ्रेंच ,हबशी हे समुद्री चाचे व्यापार करण्याच्या नाटकाने हिंदू भूमीस लुटण्याच्या वाईट हेतूने आले त्यांचे हे काळे कृत्य त्यांच्या कृतीतून उघड झाले
तत्कालीन लुटारुंस हिंदू भूमीचे रहस्य उलगडले जर येथे आपण राज्य केले तर अधिकाधिक संपत्ती मायदेशी आपण नेऊ शकतो
म्हणून व्यापार्यांच्या वेशात तत्कालीन राजकर्त्या चे   अधिकाधिक सवलती मिळविण्यासाठी नजराणे देऊन मन वळविले
व त्यांच्या वकिलांतर्फे इतर राज्याच्या राज्य कर्त्यान विरुध्द मदत करू अशी आश्वासने देत परंतु ह्यांचा गुप्त हेतू ह्यांनी कधी येथील बलवान असलेल्या राज्य कर्त्यांस कळू दिला नाही , आणि कमजोर यादवी माजलेल्या राज्य कर्त्यांस दगा देऊन त्यांची भूमी गिळून तेथील शासक बनले .
साम्राज्य विस्तार करण्याची जरी ह्यांना प्रचंड घाई आणि स्पर्धा  लागलेली तरी शक्तिशाली राज्य कर्त्यांना ह्यांनी त्यांचे  खायचे दात दाखविले नव्हते म्हणून तर यांनी हिंदुभूमितील राज्यकारण्यांच्या मूर्खपणाचा फायदा घेत विशेषतः तत्कालीन राज्यकर्त्यांच्या भ्रष्ट लाचखोर अधिकार्यांमुळे येथील सत्ता लयास गेली विशेषतः बंगाल मधील ! यादवीचा फटका बसू नये म्हणून
तैनाती फौजेचा कायदा अनेक मूर्ख राज्य कर्त्यांनी मान्य करून येथील प्रजेला गुलाम बनविले . हे लुटारू काही शूर पराक्रमी धाडसी नव्हते ह्यांनी सर्वांना मूर्ख बनवून विजय संपादित केले, यांचे विजय हे मुळातच तहांमुळे झालेले होते ,तैनाती फौजेचे आयते बांडगुळ यांना मिळाले ,हिंदू भूमीतील मराठा ,महार ,शीख ,गुरखा व इतर सैनिकांच्या बाहुबलाचा व शक्तीचा वापर करून  यांनी येथील जनतेला गुलाम बनविले होते . हिंदुभूमी स्वतंत्र होता होता येथील राजकारण्यांच्या दुही मूळे ती विभागली गेली !इंग्रजांबरोबर फ्रेंच आणि हबशींनी राज्य सोडले मात्र पाखले बांड गुळा सारखे गोमान्ताकास चिटकून बसले .
आणि एके दिवशी क्रांतिकारकांच्या मोठ्या संघर्षानंतर  गोवा स्वतंत्र झाले !